जिल्हाधिकाऱयांना निवेदन :
प्रतिनिधी/ बेळगाव
कोरोनामुळे सर्वसामान्य जनता हताश झाली आहे. सध्या पाऊस असल्यामुळे विविध साथीच्या आजारांनी डोके वर काढले आहे. त्या साथीमुळे अनेक जण आजारी पडत आहेत. मात्र त्यांना उपचार मिळणे अशक्मय झाले आहे. खासगी हॉस्पिटल बंद करण्यात आले आहेत. याचबरोबर खासगी डॉक्टरांनीही आपले दवाखाने बंद केले आहेत. त्यामुळे सर्वसामान्य जनतेला मोठा त्रास होत आहे. तेव्हा खासगी हॉस्पिटल आणि दवाखाने सुरू करावेत, याचबरोबर जिल्हा प्रशासनानेही स्वतंत्र डॉक्टरांची नेमणूक करून जनतेला सेवा द्यावी, अशी मागणी मानवाधिकारी लोककल्याण आणि भ्रष्टाचार विरुद्ध संघर्ष समितीच्यावतीने करण्यात आली.
कोविड-19 मुळे इतर आजारांनी ग्रस्त झालेल्या व्यक्तींवर उपचार करण्यास देखील नकार देण्यात येत आहे. त्यामुळे अनेकांचा मृत्यू होत आहे. यासाठी जिल्हा प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे. हृदयविकार, मधुमेह, रक्तदाब या रुग्णांना मोठा त्रास होत आहे. असे रुग्ण उपचार मिळत नसल्यामुळे दगावत आहेत. कोविड-19 ची तपासणी केल्यानंतर तातडीने अहवाल येत नाही. त्यामुळे अनेकांना नाहक हॉस्पिटलमध्ये थांबावे लागत आहे. तेंव्हा त्याचा अहवालही लवकरात लवकर द्यावा, अशी मागणीही या निवेदनात करण्यात आली आहे.
महसूल अधिकाऱयांना निवेदन देण्यात आले. यावेळी नियाज मुल्ला, विजय सांबरेकर, जुबेदाबी पठाण, अरुण सालगुडे, शकील बिडीकर, रहिमा कारदी यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.