पुलाची शिरोली / वार्ताहर
सर्वसामान्य व्यापारी व उद्योजकांचा अभ्यासू आमदार हरपला अशी हळहळ स्मॅक अध्यक्ष दिपक पाटील यांनी व्यक्त केली. शिरोली मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन कोल्हापूर ( स्मॅक ) मार्फत आयोजित आमदार चंद्रकांत जाधव यांच्या शोकसभेत ते बोलत होते. स्मॅकचे अध्यक्ष दिपक पाटील यांच्या हस्ते चंद्रकांत जाधव यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला.
यावेळी स्मॅकने आमदार चंद्रकांत जाधव यांच्यावर केलेली चित्रफित दाखवण्यात आली. अध्यक्ष दिपक पाटील म्हणाले की सर्व सामान्य घरातून आलेला सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगातील अभ्यासू माणूस चंद्रकांत जाधव यांच्या माध्यमातून विधानसभेत पोहचला. त्यांनी वीज प्रश्न हा अतिशय प्रामुख्यानं मांडलेला आहे आणि त्याची सोडवणूक कशी करता येईल असा प्रयत्न अतिशय जोरदार पद्धतीने केला आहे.
उपाध्यक्ष एम. वाय. पाटील म्हणाले की, उद्योगा संबंधी सर्व प्रश्नांची त्यांना जाण होती. पहिल्यापासूनच ते वीज दर वाढ, कच्च्या मालाची दरवाढ या समस्यांवर कायम आवाज उठवत होते. रोखठोक बोलून उद्योगांच्या सर्व प्रश्नांची जाण असलेला आमचा पाठिंबा हरपलेला आहे.जेष्ठ सुरेंद्र जैन म्हणाले, महाराष्ट्राचा विकास व्हावा, कोल्हापूरचा विकास व्हावा, जिल्ह्याचा विकास व्हावा अशी एक रास्ता पेक्षा असते. त्यांच्या निधनाने विकासाला निश्चितच एक मोठा धक्का बसला आहे,.
गोशिमाचे अध्यक्ष मोहन पंडितराव म्हणाले, कोल्हापूरच्या उद्योजकतेसाठी त्यांच्याकडे बऱ्याच योजना होत्या. विशेषता गोशिमा मध्ये केला जाणारा कॉमन फॅसिलिटी सेंटर हा प्रकल्प नुसता कोल्हापुरात नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रात अद्वितीय केंद्र आपण निर्माण करूया असे त्यांचे स्वप्न होते. याप्रसंगी जयदीप चौगले, शिरोली सॅण्ड रेक्लमेशन प्लांट चेअरमन नीरज झंवर, अमर जाधव, प्रशांत शेळके, रवी डोली, अविनाश चिकणीस, शेखर कुसाळे, अतुल पाटील, आदी उपस्थित होते.