मोबाइल डिजिटल मुव्ही थिएटर कंपनी ‘पिक्चर टाइम डिजिप्लेक्सन’ने लेहमध्ये जगातील सर्वात उंच पहिला मूव्हिंग सिनेमा थिएटर तयार केला आहे. भारताच्या प्रत्येक क्षेत्रातील लोकांना डिजिटल चित्रपटाचा अनुभव मिळवून देणे हा याचा मुख्य उद्देश आहे. 11 हजार 562 फूटांच्या उंचीवर स्थापन हा इन्फ्लेटेबल थिएटर पेंशासित प्रदेश लडाखमधील पहिले मूव्हिंग सिनेमा थिएटर ठरले आहे.
क्रिटिकली अक्लेम्ड शॉर्ट फिल्म ‘सेकूल’चे (लडाखची पार्श्वभूमी असणारा) यावेळी प्रदर्शन करण्यात आले आहे. या लघुपटाला स्थानिक लोकांची मोठी पसंती मिळाली आहे.
150 आसनांची व्यवस्था
डॉल्बी 5.1 साउंडसोबत मोठय़ा स्क्रीनवर डिजिटल चित्रपटाचे स्क्रीनिंग करण्यात आले. या इन्फ्लेटेबल क्षेत्रात सुमारे 150 लोकांच्या बसण्याची व्यवस्था आहे. सद्यकाळात कोरोना दिशानिर्देशांमुळे थिएटरमध्ये सुमारे 75 आसने आहेत.
अत्याधुनिक सुविधा
यात अत्याधुनिक हीटिंग सुविधेचा वापर करत एम्बिए&ट कंट्रोल थिएटरही असेल. लडाख दीर्घकाळापासून मोठय़ा पडद्यावरील चित्रपटापासून दूर होता. पुढील 30 दिवसांमध्ये लडाखमध्ये दोन कायमस्वरुपी सिनेमा स्क्रीन्स आणि एक मूव्हींग सिनेमा स्क्रीन उपलब्ध करण्यात येणार असल्याचे कंपनीचे सीईओ सुशील चौधरी यांनी म्हटले आहे.