मास्टरप्लॅन 2040 नुसार अंमलबजावणी , 60 टक्के हिस्सा हिरवाईने व्यापणार
जगातील एका मोठय़ा वाळवंटात वसलेले शहर दुबई आता स्वतःच्या निम्म्यापेक्षा अधिक हिस्स्याला हिरवाईत (झाडांनी आच्छादलेले) बदलू पाहत आहे. दुबई अर्बन मास्टर प्लॅन 2040 नुसार सरकारची योजना दुबईच्या 60 टक्के हिस्स्याला हिरवाईने आच्छादण्याची आहे. राजे शेख मोहम्मद बिन राशिद अल मकतूम, पंतप्रधान आणि दुबईच्या शासकाकडून प्रसिद्ध मास्टरप्लॅनचा उद्देश दुबईला वास्तव्य आणि काम करण्याच्या दृष्टीने जगातील सर्वात चांगले शहर ठरविणे आहे.
2008 मध्ये दुबईच्या एकूण क्षेत्रफळाचा 8 टक्के देखील झाडांनी आच्छादलेला नव्हता. पण 2020 पर्यंत शहरी क्षेत्राचा 35 टक्के हिस्सा झाडांनी व्यापला गेला आहे. पण शहरी हिस्सा पूर्ण दुबईच्या क्षेत्रफळाच्या केवळ 20 टक्के इतकाच आहे. साधनसामग्रीचा उत्तम वापर, तंदुरुस्त आणि सर्वसमावेशक समुदायांच्या विकासावर भर देण्यात येणार आहे. 2040 पर्यंत दुबईची लोकसंख्या 58 लाख होण्याचा अनुमान आहे. हेच लक्षात घेत हिरवे आच्छादन वाढविण्याची योजना आहे.
समुद्र किनाऱयांची लांबी
निसर्गाचे भांडार आणि ग्रामीण नैसर्गिक क्षेत्र अमिरातच्या एकूण क्षेत्राच्या 60 टक्के हिस्सा असतील. वस्ती आणि कार्यस्थळांना जोडण्यासाठी अनेक ग्रीन कॉरिडॉर निर्माण केले जातील, जे पायी चालणारे आणि सायकलस्वारांनाही दिलासा देणारे असणार आहेत. हॉटेल आणि पर्यटकांकरता वापरल्या जाणाऱया भूमी क्षेत्रात 134 टक्क्यांची वाढ होणार आहे. शिक्षण आणि आरोग्य सुविधांसाठी 25 टक्के अतिरिक्त जमीन उपलब्ध करण्यात येईल. तर सार्वजनिक समुद्र किनाऱयांची लांबी 400 टक्क्यांपर्यंत वाढणार आहे.