अमेझॉनचे संस्थापक बेजोस अंतराळातून परतले
वृत्तसंस्था / सॅन फ्रान्सिस्को
जगातील आघाडीच्या ई-कॉमर्स कंपन्यांमध्ये सामील अमेझॉनचे संस्थापक जेफ बेजोस हे अंतराळाचा 11 मिनिटांचा प्रवास करून पृथ्वीवर परतले आहेत. भारतीय प्रमाणवेळेनुसार मंगळवारी संध्याकाळी 6.42 वाजता ते अंतराळासाठी रवाना झाले, या प्रवासात त्यांच्यासोबत आणखीन तिघेजण होते. यात त्यांचा बंधू मार्क, 82 वर्षीय व्हॅली फंक आणि 18 वर्षीय ओलिवर डेमन सामील होता. कॅप्सूल पृथ्वीवर उतरल्यावर ब्ल्यू ओरिजिन या कंपनीकडून स्पेसफ्लाइट इतिहासात या ऐतिहासिक क्षणापर्यंत पोहोचण्यासाठी ब्ल्यू पास्ट आणि सर्व लोकांचे अभिनंदन असे म्हटले गेले आहे.
बेजोस यांनी अंतराळात जाण्यासाठी निवडलेला दिवसही महत्त्वाचा होता. कारण अपोलो 11 स्पेसशिपद्वारे अंतराळवीर नील आर्मस्ट्राँग आणि बज एल्ड्रिन मंगळवारपासून बरोबर 52 वर्षांपूर्वी 1969 मध्ये चंद्रावर पोहोचले होते.
बेजोस आणि त्यांची टीम ज्या रॉकेट शिपने अंतराळात पोहोचले ते स्वयंचलित असल्याने त्याला वैमानिकाची गरज भासत नाही. याच्या कॅप्सूलमध्ये 6 सीट्स असले तरीही यातील केवळ 4 सीट्स भरण्यात आल्या होत्या. न्यू शेफर्ड नावाच्या या रॉकेटच्या आतापर्यंत 15 फ्लाइट्स यशस्वी ठरल्या आहेत. पण यातून आतापर्यंत मानवी प्रवास झाला नव्हता.
ब्रॅन्सन यांची अंतराळभरारी
11 जुलै रोजी ब्रिटिश अब्जाधीश रिचर्ड ब्रॅन्सन यांच्या वर्जिन स्पेसशिप युनिटी स्पेसप्लेनची फ्लाइट यशस्वी ठरली होती. ही फ्लाइट 85 किलेमीटर अंतरापर्यंत पोहोचली होती. विशेष बाब म्हणजे ब्रॅन्सन यांच्यासोबत भारतीय वंशाची शिरिशा बांदला देखील अंतराळप्रवासावर गेली होती. तर बेजोस यांचा न्यू शेपर्ड रॉकेट तयार करणाऱया इंजिनियर्सच्या टीममध्ये महाराष्ट्राच्या कल्याण येथील 30 वर्षीय संजल गवांडे हिचा समावेश होता.
बेजोस यांच्या फ्लाइट्चे उड्डाण
बेजोस यांची फ्लाइट 11 मिनिटांची सबऑबिर्टल फ्लाइट राहिली. पश्चिम टेक्सासच्या वाळवंटातून या रॉकेटने उड्डाण केले होते. याकरता सर्व प्रवासी प्रक्षेपणाच्या 45 मिनिटांपूर्वी ऑन-बोर्ड झाले. चालक दलाने मोहिमेसाठी 48 तासांचे प्रशिक्षण घेतले होते. कर्मचाऱयांनीही दोन दिवस प्रत्येकी 8 तासांचे प्रशिष्घ्ण पूर्ण केले. हे प्रशिक्षण अंतराळप्रवासासाठी तिकीट खरेदी करणाऱया ग्राहकांसाठीही अनिवार्य असेल.
कॅप्सूलचे मार्गक्रमण
या फ्लाइटनंतर फंक सर्वात वृद्ध तर डेमेन सर्वात तरुण अंतराळवीर ठरला आहे. सुमारे 3 मिनिटांच्या फ्लाइटनंतर ब्ल्यू ओरिजिनच्या न्यू शेपर्ड रॉकेटमधून बेजोस यांचा कॅप्सूल विभक्त झाला आणि अंतराळात पुढे सरकला. 4 मिनिटांचे उड्डाण केल्यावर कॅप्सूल 100 किलोमीटर वर म्हणजेच कारमन लाइन ओलांडून पुढे पोहोचला. यादरम्यान अंतराळवीरांना भारहीनतेचा अनुभव आला. याचबरोबर कॅप्सूलने पृथ्वीवर परतण्यास प्रारंभ केला. 11 मिनिटांच्या फ्लाइटनंतर कॅप्सूल पॅराशूटच्या मदतीने वाळवंटात उतरले. यादरम्यान रॉकेटही पृथ्वीवर परतले आहे.
विक्रमांची नोंद
या प्रवासासोबत बेजोस यांच्या फ्लाइटने अनेक विक्रम प्रस्थापित केले आहेत. ही ब्ल्यू ओरिजिनची पहिली वैमानिकरहित सबऑर्बिटल फ्लाइट असून यातून सामान्य नागरिकांनी प्रवास केला आहे. सर्वात वृद्ध आणि सर्वात तरुण अंतराळवीराचा विक्रमही या फ्लाइटशी जोडला गेला आहे. न्यू शेपर्ड रॉकेट आणि त्याचे कॅप्सूल आरएसएस फर्स्ट स्टेपचा पुन्हा वापर करता येऊ शकतो.