वयाच्या 71 व्या वर्षीही वाढतोय आकार
तुर्कस्तानातील एक व्यक्ती स्वतःच्या नाकामुळे जागतिक विक्रम प्रस्थापित करण्यास यशस्वी ठरला आहे. जगातील सर्वात मोठे नाक असणारा व्यक्ती म्हणून त्याचे नाव नोंदविले गेले आहे. वयाच्या 71 व्या वर्षातही या व्यक्तीचे नाक सातत्याने वाढत आहे.
तुर्कस्तानचे 71 वर्षीय मेहमेत ओजीयुरेक यांचे नाव गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये नोंद आह. मेहमेत यांचे नाक जगात आतापर्यंत अस्तित्वातअसलेल्या कुटल्याही माणसाच्या नाकापेक्षा मोठे आहे.
मेहमेत ओजीयुरेक हे 8.8 सेंटीमीटर (3.46 इंच) लांब नाक असलेले जगातील एकमेव हयात व्यक्ती आहेत. मार्च 2010 मध्ये स्वतःच्या नाकासाठी त्यांचे नाव गिनिज वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये नोंदले गेले होते. हा विक्रम अद्याप कुणालाच मोडता आलेला नाही. माझ्या नाकाची लांबी अजूनही वाढत असल्याचे ओजीयुरेक यांनी सांगितले आहे.
ओजीयुरेक यांचे नाव जगाच्या जिवंत व्यक्तींमध्ये सर्वात मोठे असले तरीही इतिहासात सर्वाधिक लांब नाकाचा विक्रम थॉमस वेडर्सच्या (ब्रिटन) नावावर नोंद आहे. 18 व्या शतकात थॉमसचे नाव अविश्वसनीय स्वरुपात सुमारे 19 सेंटीमीटर लांबीचे होते. पण आता ते जिवंत नाहीत. याचमुळे सर्वात मोठय़ा नाकाचा विक्रम मेहमेत ओजीयुरेक यांच्या नावावर आहे.