इराण अन् उत्तर कोरियालाही टाकले मागे
युक्रेनसोबत युद्धादरम्यान रशियाच्या नावावर एक नकोसा विक्रम नोंदविला गेला आहे. रशिया सद्यकाळात जगातील सर्वाधिक निर्बंध झेलणारा देश ठरला आहे. नव्या निर्बंधांनंतर रशियाने इराण आणि उत्तर कोरियालाही मागे टाकले आहे. अमेरिका आणि युरोपीय महासंघाने रशियावर 2,778 नवे निर्बंध लादले आहेत. हे सर्व मिळून रशियावर आता 5,530 निर्बंध आहेत. रशियावर 2,754 निर्बंध 22 फेब्रुवारीपासूनच लागू होते. 22 फेब्रुवारीपासून आतापर्यंत 2,778 नवे निर्बंध लादण्यात आले आहेत.
इराणवर मागील 10 वषांमध्ये 3,616 निर्बंध लादण्यात आले. यातील बहुतांश निर्बंध इराणचा आण्विक कार्यक्रम आणि दहशतवादाला मदत केल्याप्रकरणी लादण्यात आले होते. तर सीरिया आणि उत्तर कोरियावर अनुक्रमे 2,608 आणि 2,077 निर्बंध आहेत. परंतु अता रयिशावर केवळ 10 दिवसांमध्ये अनेक निर्बंध लादले गेल्याने सर्व विक्रमच मोडीत निघाले आहेत.
रशियावर सर्वाधिक निर्बंध (568) स्वीत्झर्लंडकडून लागू करण्यात आले आहेत. त्यानंतर युरोपीय महासंघ (518), फ्रान्स (512)चा क्रमांक लागतो. अमेरिकेने रशियावर आतापर्यंत 243 निर्बंध लादले आहेत.