वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
6उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव आणि त्यांचे बंधू प्रतीक यादव यांना बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. सोमवारी या आरोपांची प्राथमिक चौकशी बंद करण्यासाठी सीबीआयच्या अहवालाची प्रत मागणारी याचिका फेटाळण्यात आली. तसेच सर्वोच्च न्यायालयाने सीबीआयचा 2013चा क्लोजर रिपोर्टही मंजूर केला. काँग्रेस नेते विश्वनाथ चतुर्वेदी यांनी सीबीआयने हे प्रकरण बंद करण्यासाठी याचिका दाखल केली होती. या खटल्याच्या सुनावणीदरम्यान युक्तिवाद ऐकल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने केंद्रीय तपास संस्था सीबीआयने 7 ऑगस्ट 2013 रोजी या आरोपांचा तपास आधीच बंद केला असल्यामुळे या याचिकेत योग्यता नसल्याचे स्पष्ट केले. याचिकेत मुलायमसिंग यादव यांच्यावर 1999 ते 2005 दरम्यान उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री असताना भ्रष्टाचार आणि 100 कोटी ऊपयांपेक्षा जास्त मालमत्ता जमवल्याचा आरोप केला होता.