ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
कोविड व्यवस्थापन प्रकरणाची सुनावणी करणारे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती डी वाय चंद्रचूड यांना कोरोनाची लागण झाली आहे. चंद्रचूड यांच्या शिवाय त्यांच्या स्टाफमधील काही सदस्यांचे रिपोर्ट देखील कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, न्या. चंद्रचूड यांची तब्येत बरी असली तरी त्यांच्या अध्यक्षतेखालील पीठासमोर आता कोणतीही सुनावणी होणार नाही आहे. दरम्यान, कोविड -19 च्या संकटा संदर्भातील गुरुवारी होणारी सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे.
- चंद्रचूड यांच्या विषयी :
न्यायमूर्ती धनंजय यशवंत चंद्रचूड हे सद्यस्थितीतील भारतात सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश आहेत. यापूर्वी त्यांनी इलाहाबाद उच्च न्यायालयात मुख्य न्यायाधीश आणि मुंबई हायकोर्टात न्यायाधीश म्हणून आपली सेवा दिली आहे. 13 मे 2016 रोजी चंद्रचूड यांची भारतातील सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांचा जन्म 11 नोव्हेंबर 1959 रोजी एका मराठी कुटुंबात झाला होता.