वृत्तसंस्था/ मुंबई
महिंद्रा समुहाचा एक भाग असलेल्या ‘महिंद्रा’च्या ‘ट्रक अँड बस डिव्हिजन’ने (एमटीबी) ‘ब्लाझो एक्स हेवी’, ‘फ्युरिओ इंटरमीजिएट’ आणि ‘फ्युरिओ-सेव्हन’ व ‘जायो’ हे ‘लाईट कमर्शिअल ट्रक’ या संपूर्ण ‘बीएस-सिक्स’ श्रेणीसाठी “अधिक मायलेज मिळवा किंवा ट्रक परत द्या’’ ही अनोखी योजना 2016 नंतर यंदा पुन्हा सुरु केली आहे.
या नवीन श्रेणीमध्ये ‘फ्युएलस्मार्ट’ तंत्रज्ञानाने युक्त अनेक प्रगत तांत्रिक उपकरणे बसविण्यात आली आहेत. यातून जास्त मायलेज मिळते. वाहतूकदारांचा 60 टक्क्मयांहून अधिक खर्च इंधनावर होतो.
‘महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेड’च्या ‘ऑटोमोटिव्ह सेक्टर’चे मुख्य कार्यकारी अधिकारी विजय नाकरा म्हणाले, आमची ही हमी म्हणजे व्यावसायिक वाहनांच्या उद्योगात महत्त्वपूर्ण पाऊल आहे. इंधनाच्या वाढत्या किमती पाहता, ग्राहकांसाठीचा मूल्य प्रस्ताव सादर करण्यासाठी यापेक्षा चांगली वेळ नव्हती. यातून या वाहन विभागासाठीची आमची कटिबद्धताही व्यक्त होईल. असे आव्हान 2016 मध्ये पहिल्यांदा देण्यात आले त्यावेळी एकही ट्रक परत आला नव्हता.
त्वरीत सर्व्हिसिंगची सोय
याव्यतिरिक्त, एमटीबी आपल्या ग्राहकांना त्वरीत सर्व्हिसिंग करून देण्याची हमी देत आहे. ट्रकचालकांनी ही सर्व्हिस एखाद्या महामार्गावर किंवा वितरकाच्या वर्कशॉपमध्ये घेतली, तरी त्यांना त्वरेने सेवा मिळेल, याची खात्री एमटीबीतर्फे देण्यात येते. मायलेजची ही हमी देताना कंपनीने काही अटी व नियम घालून दिले आहेत.