झुरीच/ वृत्तसंस्था
2021 सालातील फिफाच्या सर्वोत्तम फुटबॉलपटू पुरस्कार शर्यतीमध्ये अर्जेंटिनाचा हुकमी स्ट्रायकर लायोनेल मेस्सी आणि पोर्तुगालचा कर्णधार ख्रिस्तियानो रोनाल्डो आघाडीवर आहेत.
फिफातर्फे पुरस्कार वितरण समारंभ 17 जानेवारी 2022 रोजी व्हर्च्युअल स्वरुपात होणार आहे. 2021 फुटबॉल हंगामात पुरुष आणि महिलांच्या विभागात सर्वोत्तम कामगिरी करणाऱया फुटबॉलपटूंची निवड करण्यासाठी फिफाने 2 तज्ञ निवड समितीची नियुक्ती केली आहे. पुरुषांच्या विभागात लिव्हरपूलच्या मोहम्मद सलाहचा समावेश आहे. महिला गटात मॅगडेलेना एरिक्सन, पर्नेली हार्डर आणि सोयून यांच्यात चुरस निर्माण झाली आहे.