ग्राहक ताटकळत : दुपारनंतर पोस्ट कार्यालयात शुकशुकाट
प्रतिनिधी /बेळगाव
देशभरातील पोस्ट कार्यालयांमध्ये सोमवारी सकाळपासून सर्व्हर डाऊन होते. त्यामुळे सेव्हिंग अकाऊंटसह पोस्ट लाईफ इन्शुरन्सचे काम थंडावले. यामुळे ग्राहकांना बराच काळ कार्यालयात ताटकळत बसावे लागले. सर्व्हर नसल्यामुळे कर्मचाऱयांनाही ग्राहकांच्या प्रश्नांना उत्तर देईपर्यंत नाकीनऊ आले.
देशभरातील पोस्ट कार्यालयांना मुंबई व म्हैसूर येथील एका खासगी कंपनीकडून सर्व्हरचा पुरवठा केला जातो. परंतु सोमवारी सकाळपासून सर्व्हरमध्ये बिघाड होण्यास सुरुवात झाली. सर्व्हर नसेल तर कोणतेच ऑनलाईन काम करणे शक्मय नसते. सर्व्हर डाऊनचा सर्वाधिक फटका पोस्टाच्या बचत खात्याला बसला. सोमवारी आठवडय़ाचा पहिला दिवस असल्यामुळे बचत खात्याकडे पैसे भरण्यासाठी नागरिकांची गर्दी झाली होती. परंतु सर्व्हर नसल्यामुळे त्यांना ताटकळत बसावे लागले. दुपारनंतर काही प्रमाणात बचत खात्याचे काम सुरू झाले.
पोस्ट लाईफ इन्शुरन्ससाठी सर्व्हरची आवश्यकता लागते. सर्व्हर नसल्यामुळे लाईफ इन्शुरन्स भरण्यासाठी व नवीन लाईफ इन्शुरन्ससाठी नावनोंदणी करणाऱया ग्राहकांना दुसऱया दिवशी येण्यास सांगण्यात आले. पोस्टाच्या सर्व्हर डाऊनमुळे ग्राहकांची मात्र गैरसोय झाली. सर्व्हर नसल्याने दुपारनंतर कार्यालयात शुकशुकाट पहायला मिळाला.