कुटुंबाची अजब तऱहा
..घराचे दरवाजे, कपडे, मोबाइल फोनपासून सर्वकाही लाल किंवा पांढऱया रंगाचे दिसून येईल बेंगळूर येथील रियल इस्टेट एजंट सेवेनराज यांच्या घरात. त्यांचा हा छंद म्हणा किंवा वेडेपण, पण यामुळे त्यांचे पूर्ण कुटुंब परिसरात प्रसिद्ध झाले आहे.
सेवेनराज 7 या अंकाला स्वतःसाठी लकी मानतात, एवढेच नाही तर स्थानिक लोकांना 007 अशीच हाक मारतात.
स्वतःच्या आईवडिलांचे 7 वे अपत्य असल्याने सेवेनराज 7 अंक लकी मानतात. याचमुळे त्यांचे नाव सेवेनराज पडले आहे. स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी त्यांनी सर्वकाही पांढऱया आणि लाल रंगात रंगवून घेतले आहे.
7 अंक लकी असल्याने त्यांनी 7 भाषा शिकून घेतल्या आहेत. सेव्हन यांच्या घरात सर्वकाही लाल किंवा पांढरेच आहे. घर, गाडी आणि कपडे, फोनचे कव्हर, घडय़ाळ, कफलिंक, अंगठी, बेसलेट आणि हेडफोन देखील लाल आणि पांढऱया रंगाचे आहेत.
सेव्हन यांच्या घरातील पूर्ण इंटीरियर देखील लाल आणि पांढऱया रंगाचे आहे. सोफा, भिंत आणि पडदे देखील याच दोन्ही रंगांमध्ये दिसून येतात. स्वतःच्या या नव्या ओळखीमुळे हे कुटुंब अत्यंत आनंदी आहे.