बेळगाव : कोल्हापूर येथील नामांकित सलगर अमृततुल्य चहाचा आता ब्रह्मनगर, उद्यमबाग येथे आस्वाद घेता येणार आहे. नुकतेच या चहा कॅफेचे उद्घाटन झाले. नगरसेवक महेश मुळगुंद व रमेश मैल्यागोळ यांच्या हस्ते या कॅफेचे उद्घाटन झाले.
शगुन गार्डनसमोर ब्रह्मनगर येथे नव्याने सलगर अमृततुल्य चहा सुरू करण्यात आला आहे. सलगर अमृततुल्य चहाने महाराष्ट्रात मोठे नाव कमावले असून आता हा चहा बेळगावमध्येही दाखल झाला आहे. चहासोबतच ग्राहकांना क्रीम रोल व कोल्हापूर भडंगचा आस्वाद घेता येणार आहे.
या उद्घाटन कार्यक्रमप्रसंगी सलगर अमृततुल्य चहाचे संस्थापक दादू सलगर, पांडुरंग सलगर उपस्थित होते. त्यांनी सलगर चहाविषयी उपस्थितांना माहिती दिली. या उद्घाटनप्रसंगी बेळगाव परिसरातील चहाप्रेमी नागरिक व इतर मोठय़ा संख्येने उपस्थित होते.