सेन्सेक्स व निफ्टी नव्या विक्रमावर झेपावले
वृत्तसंस्था /मुंबई
जागतिक पातळीवरील सकारात्मक कल आणि विदेशी गुंतवणूकदारांच्या मदतीने सलग आठव्या सत्रात भारतीय भांडवली बाजाराने नवा विक्रम नोंदवला असल्याचे दिसून आले. यामध्ये सेन्सेक्स व निफ्टी या निर्देशाकांनी नवी उंची प्राप्त केली आहे.
दिग्गज कंपन्यांच्या मदतीने बीएसई सेन्सेक्स दिवसअखेर 184 अंकांनी वधारुन निर्देशांक 63,284.19 वर बंद झाला आहे. दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 54 अंकांनी मजबूत होत निर्देशांक 18,812.50 वर बंद झाला आहे. याच दरम्यान काहीवेळ सेन्सेक्सने 483 अंकांची वाढ दर्शवली होती.
सेन्सेक्समध्ये अल्ट्राटेक सिमेंट, टाटा स्टील, टीसीएस, टेक महिंद्रा, विप्रो, इन्फोसिस, एचसीएल टेक आणि लार्सन ऍण्ड टुब्रो यांचे समभाग नफा कमाईसह बंद झाले आहेत. अन्य कंपन्यांमध्ये आयसीआयसीआय बँक, महिंद्रा ऍण्ड महिंद्रा, पॉवरग्रिड कॉर्प आणि कोटक महिंद्रा बँक यांचे समभाग नुकसानीसह बंद झाले आहेत. बीएसई स्मॉलकॅपचा निर्देशांक 0.63 टक्क्यांनी व मिडकॅपचा निर्देशांक 0.62 टक्क्यांनी वाढला आहे.
पीएमआयचा प्रभाव
भारतीय बाजाराला सकारात्मक स्थिती ही पीएमआयच्या आलेल्या आकडेवारीमुळे प्राप्त झाली. माहिती तंत्रज्ञान कंपन्यांच्या समभागात तेजीचा कल राहिला होता. एस ऍण्ड पी ग्लोबल इंडियाकडून सादर करण्यात आलेल्या पीएमआयच्या आकडेवारीनुसार नोव्हेंबर महिन्यात हा निर्देशांक 55.7 टक्क्यांवर राहिला आहे. जो ऑक्टोबरमध्ये 55.3 टक्क्यांच्या तुलनेत वाढत गेल्याची नोंद आहे.
जागतिक पातळीवरील घडामोडींमध्ये फेडरल रिझर्व्हचे प्रमुख जेरोम पॉवेल यांनी व्याजदर वाढीबाबत नरमाईचा कल राहणार असल्याचे म्हटल्याने देशातील बाजारांना बळ मिळाल्याचे दिसून आले. मात्र मागील दोन तीन दिवसांप्रमाणे मोठी उसळी मात्र गुरुवारी बाजारात दिसून आली नाही. आशियातील अन्य बाजारांमध्ये सोल, टोकीओ, शांघाय आणि हाँगकाँगच्या मुख्य निर्देशांकात वाढ राहिली आहे. यासोबतच आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चे तेल 0.40 टक्क्यांनी घसरुन 87.32 डॉलर प्रति बॅरेलवर राहिले होते.
समभाग वधारलेल्या कंपन्या
- टाटा स्टील……… 110
- हिंडाल्को………… 463
- अल्ट्राटेक सिमेंटस् 7274
- टीसीएस………. 3475
- ग्रेसीम…………. 1799
- टेक महिंद्रा……. 1101
- विप्रो…………….. 413
- लार्सन टुब्रो……. 2104
- एचसीएल टेक… 1136
- इन्फोसिस…….. 1657
- अदानी पोर्टस्…… 890
- अपोलो हॉस्पिटल 4775
- एचडीएफसी लाईफ 596
- एसबीआय………. 608
- ब्रिटानिया…….. 4401
- बजाज फिनसर्व्ह 1638
- हिरो मोटो कॉर्प. 2871
- एचडीएफसी बँक 1619
- एसबीआय लाईफ इन्शु. 1290
- इंडसइंड बँक….. 1173
- बजाज फायनान्स 6747
समभाग घसरलेल्या कंपन्या
- युपीएल…………. 778
- आयशर मोटर्स… 3437
- आयसीआयसीआय बँक….. 940
- सिप्ला…………. 1124
- बजाज ऑटो…… 3707
- पॉवरग्रीड कॉर्प…. 221
- महिंद्रा अँड महिंद्रा 1293
- एचयुएल………. 2662
- बीपीसीएल…….. 338
- ओएनजीसी…….. 140
- नेस्ले………….. 20049
- कोटक महिंद्रा…. 1934
- टायटन………… 2638
- कोल इंडिया…….. 226
- डॉ. रेड्डीज लॅब्ज. 4474
- रिलायन्स……… 2723
- टाटा मोटर्स…….. 438
- मारुती सुझुकी… 8958
- आयटीसी……….. 339
- अदानी एंटरप्रायजेस 3915
- भारती एअरटेल 848