आगामी काळातही मजबूत कामगिरीचे संकेत
नवी दिल्ली
देशातील मागणीमध्ये सुधारणा झाल्याच्या कारणामुळे भारतामधील सेवा क्षेत्रात जानेवारीमध्ये सलग चौथ्या महिन्यात वाढ झाल्याचे पहावयास मिळाले आहे. व्यापार क्षेत्राने घेतलेल्या गतीने नवा आशावाद निर्माण झाल्याने सेवा क्षेत्रात वृद्धीचे वारे वाहत आहे. आगामी काळातही ही वृद्धी आणखी मजबूत राहणार असल्याचे संकेत व्यक्त केले जात आहेत.
एका मासिक सर्वेक्षणानुसार बुधवारी सादर करण्यात आलेल्या माहितीनुसार हवामानाच्या समतोल वातावरणामुळे भारताच्या सेवा व्यवसायाने गती प्राप्त केल्याने या क्षेत्राचा निर्देशांक जानेवारीत वाढून 52.8 वर पोहोचला आहे. जो डिसेंबरमध्ये 52.3 वर राहिला होता. सदर निर्देशांकांमध्ये 50 पेक्षा अधिक अंक राहणे म्हणजे व्यापारात तेजी प्राप्त झाली आहे, असा त्याचा अर्थ होतो. निर्देशांकाने मागील जानेवारीसोबत एकूण चार महिन्यात 50 पेक्षा अधिक अंकांची कामगिरी केल्याची नोंद करण्यात आली आहे.
सर्वेक्षणामध्ये नोंदवलेल्या वृद्धीचा वेग डिसेंबर महिन्याच्या तुलनेत अधिक आहे, परंतु अजूनही दीर्घ कालावधीसाठी काम करत राहावे लागणार आहे. लॉकडाऊनमधून मिळणारी शिथिलता आणि मागणीतील मजबूत स्थिती यामुळे विक्रीला मोठय़ा प्रमाणात वेग येताना दिसतो आहे.