प्रतिलिटर 20 पैशांनी स्वस्त
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
भारतीय बाजारात केवळ डिझेलच्या किमतींमध्ये घट झाल्याचे पाहायला मिळत आहे. गेल्या 34 दिवसांपासून देशात पेट्रोलचे दर स्थिर आहेत. तर डिझेलच्या दरात सलग तिसऱया दिवशी 20 पैशांची घट झाली आहे. मुंबईत शुक्रवारी पेट्रोलची किंमत 107.83 रुपये प्रतिलिटरवर स्थिर आहे, तर डिझेलची किंमत 96.84 रुपये प्रतिलिटर इतकी आहे.
कच्च्या तेलाच्या बाजारात सलग सुस्तीचा काळ सुरुच आहे. गुरुवारी या बाजारात मोठय़ा प्रमाणावर पडझड झाल्यानंतर बेंट पूडच्या दराने गेल्या चार महिन्यांतील निचांकी पातळी गाठली आहे. दरम्यान, जवळपास चार महिन्यांनी सरकारी तेल कंपन्यांनी डिझेलच्या किमतींमध्ये घट केल्याचे पाहायला मिळत आहे. तथापि, पेट्रोलच्या दरांत 4 मेनंतर 41 वेळा वाढ झाली. तर डिझेलच्या दरांमध्ये 37 वेळा वाढ झाली, तर मागील सलग तीन दिवस दरांमध्ये घट करण्यात आली. तेलांच्या किमतींमध्ये होणाऱया वाढीमुळे मध्यप्रदेश, राजस्थान, महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, ओडिशा, तामिळनाडू, केरळ, बिहार आणि पंजाब यांच्यासह 15 राज्यांमध्ये पेट्रोलच्या किमती शंभरीपार पोहोचल्या आहेत. तर राजस्थान, ओडिशा आणि मध्यप्रदेशातील काही शहरांमध्ये डिझेल 100 रुपये प्रतिलिटरवर पोहोचले आहे.