ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
क्रिकेट जगात अव्वल स्थानावर असलेला भारताचा कर्णधार विराट कोहलीने टॉप सेलिब्रेटींच्या ब्रँड व्हॅल्यूतदेखील अव्वल स्थान मिळवले आहे. विशेष म्हणजे विराटने सलग तिसऱया वषी पहिले स्थान मिळवले आहे. विराटची ब्रँड व्हॅल्यू 237 कोटी रुपये आहे.
दरम्यान, रोहित आणि सचिन तेंडूलकरपेक्षा विराट कोहलीची ब्रँड व्हॅल्यू दहापटीने जास्त आहे. उप कर्णधार रोहित शर्माची ब्रँड व्हॅल्यू 164 कोटी रूपये तर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची ब्रँड व्हॅल्यू 179 कोटी रूपये आहे.
विराट कोहलीने शाहरुख खान, सलमान खान, अक्षय कुमार, दीपिका पादुकोण, रणबीर सिंह, यासारख्या आघाडीच्या कलाकारांना मागे टाकले आहे.