मुंबई / वृत्तसंस्था
देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती पुन्हा एकदा वाढू लागल्या आहेत. पेट्रोलियम कंपन्यांनी लॉकडाऊनच्या कालावधीत पेट्रोल आणि डिझेलच्या मूळ दरात कोणताही बदल केला नव्हता. मात्र रविवारी तेल कंपन्यांनी अडीच महिन्यानंतर किंमतींचा आढावा घेत प्रतिलिटरमध्ये 60 पैशांची वाढ केली होती. सोमवारी सलग दुसऱया दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत 60 पैशांनी वाढ झाली. अशाप्रकारे सलग दुसऱया दिवशी इंधन दरवाढ झाली आहे. सोमवारी मुंबईत पेट्रोल 79.49 रुपये प्रतिलिटर आणि डिझेल दर 69.37 रुपये प्रतिलिटर इतका होता.