शनिवारी 303 अहवाल पॉझिटिव्ह, 9 जणांचा मृत्यू
प्रतिनिधी/ बेळगाव
सलग दुसऱया दिवशी 536 जण कोरोनामुक्त झाले असून त्यांना घरी पाठविण्यात आले आहे. शुक्रवारी 789 जण बरे झाले होते. शनिवारीही बरे झालेल्या बाधितांचे प्रमाण अधिक झाले असून दोन दिवसांत 1325 जण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
शनिवारी जिल्हय़ातील 303 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. यामध्ये बेळगाव तालुक्मयातील 95 जणांचा समावेश आहे. शहरातील 70 व ग्रामीण भागातील 25 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. सिव्हिल हॉस्पिटलमध्ये गेल्या 24 तासांत 9 जण कोरोनामुळे दगावले आहेत.
रायबाग, कागवाड, रामदुर्ग, सौंदत्ती, बैलहोंगल येथील प्रत्येकी 1 व बेळगाव आणि तालुक्मयातील 4 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. शहापूर, टिळकवाडी येथील दोन महिलांचा यामध्ये समावेश आहे. मृतांचा सरकारी आकडा शनिवारी 180 च्या घरात पोहोचला आहे. प्रत्यक्षात हा आकडा चार ते पाच पटीने अधिक आहे. सरकारी अहवालात मात्र शनिवारी तिघा जणांचा मृत्यू झाल्याचा उल्लेख आहे.
शनिवारीही डॉक्टर, पोलीस, वैद्यकीय कर्मचाऱयांना कोरोनाची लागण झाली आहे. कंग्राळी बी. के., सांबरा, माविनकट्टी, कडोली, देवगिरी, येळ्ळूर, मुत्नाळ, न्यू वंटमुरी, मुतगा, खासबाग, नेहरुनगर, सदाशिवनगर, गोंधळी गल्ली, शिवाजीनगर, मजगाव, केदनूर, होनगा, न्यू गुड्सशेड रोड, अशोकनगर, द्वारकानगर-टिळकवाडी परिसरात पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.
शहापूर, वडगाव, टि. व्ही. सेंटर, जुने बेळगाव, नाथ पै सर्कल, भाग्यनगर, काळी आमराई, वैभवनगर, राणी चन्नम्मानगर, हनुमाननगर, शास्त्राrनगर, श्रीनगर, गणेशपूर परिसरात पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. शनिवारी दोन खासगी डॉक्टर व बिम्स कर्मचाऱयाला कोरोनाची लागण झाली आहे. राज्य राखीव दलातील एक व सिटी पोलीस लाईनमधील एका पोलिसाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
हिंडाल्को परिसरातील 14 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. निपाणी येथील एका पोलिसाला कोरोनाची लागण झाली आहे. जिल्हा सशस्त्र दलातील सात जवानांचेही अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. सांबरा एटीएएसमधील चौघा जणांना कोरोनाची लागण झाली आहे. जिल्हा सर्वेक्षण विभागाने दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत 8 हजार 11 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर 3 हजार 542 जण सक्रिय रुग्ण आहेत.