वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
मागील महिन्यात भारतीय बाजार विदेशी गुंतवणूकदारांसाठी एक आकर्षण बनले होते. विदेशी पोर्टफोलियो गुंतवणूक (एफपीआय) जुलै महिन्यात सलग दुसऱयांदा तेजीत दिसली असून भारतीय भांडवली बाजारात निव्वळ खरेदीदार कायम राहिल्याचे पहावयास मिळाले आहे. त्यांनी कोरोना विषाणूच्या प्रभावात चमकदार कामगिरी करत भारतीय बाजारामध्ये एकूण 3,301 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे.
डिपॉझिटरच्या आकडय़ानुसार जुलै महिन्यात एफपीआयने शेअर आणि डेट बाजारात 7563 कोटींची गुंतवणूक केली आहे. याच दरम्यान त्यांनी 4,262 कोटी रुपये काढले आहेत. याप्रकारे शेअर आणि डेट बाजारात 3,301 कोटी रुपयांची निव्वळ गुंतवणूक केली आहे.