सेन्सेक्सची 622 अंकांची उसळी : एचडीएफसीचे समभागत 5 टक्क्मयांनी वधारले
वृत्तसंस्था/ मुंबई
मागील आठवडय़ाची घसरणीची साखळी चालू आठवडय़ातही सोमवारपर्यंत कायम होती. परंतु मंगळवार पसून मात्र सेन्सेक्सची कामगिरी तेजीसोबत सुरु आहे. यामध्ये बुधवारी बीएसई सेन्सेन्सने दिवसअखेर 622.44 अंकानी वधारत निर्देशांक 30,818.61 वर बंद झाला आहे. दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअर बाजारातील निफ्टी 187.45 अंकानी तेजीनोंदवत निर्देशांक 9,066.55 वर बंद झाला आहे.
जागतिक शेअर बाजारांमधील कल बुधवारी नकारात्मक असतानाही अशा वातावरणामध्ये एचडीएफसी, एचडीएफसी बँक आणि रिलायन्स इंडस्ट्रीज यांच्या समभागांमध्ये तेजी नोंदवली आहे. या कामगिरीमुळेच शेअर बाजाराला तेजीचा प्रवास पूर्ण करण्यात यश मिळाले आहे. तसेच अन्य कंपन्यांमध्ये एचडीएफसीचे समभाग 5 टक्क्मयांनी वधारले आहेत. अन्य कंपन्यांमध्ये महिंद्रा ऍण्ड महिंद्र, लार्सन ऍण्ड टुब्रो, टाटा स्टील, बजाज फायनान्स, एचडीएफसी बँक आणि सन फार्मा यांचे समभाग वधारले आहेत. मात्र दुसरीकडे इंडसइंड बँक, हिरो मोटोकॉर्प, भारती एअरटेल आणि एशियन पेन्ट्स यांचे समभाग घसरले आहेत.
कोविड19च्या वाढत्या संसर्गामुळे देशातील स्थिती चिंताजनक बनली आहे. परंतु या वातावरणातही काही निवडक समभागांमध्ये लिलाव झाल्यामुळे शेअर बाजाराला मजबूत स्थिती निर्माण करता आली. आगामी काळात मात्र शेअर बाजारातील कामगिरीमध्ये चढउताराचा प्रवास राहण्याचा अंदाज तज्ञांनी व्यक्त केला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून कोविड19 च्या वाढत्या संसर्गामुळे एक लाखांच्या पुढे आकडा गेला आहे. यामुळे आगामी काळात ही संख्या वाढण्याच्या भीतीने गुंतवणूकादारांमध्ये दबाव राहण्याचे संकेतही व्यक्त केले जात आहेत.
आशियासोबत अन्य बाजारामध्ये हाँगकाँग, टोकिओ आणि सोल या देशांमधील शेअर बाजार नफ्यात होते. तर शांघायचा बाजार मात्र नुकसानीत राहिला होता. अन्य युरोपमधील प्रमुख बाजारामधील कल मात्र घसरल्याचे पहावयास मिळाले आहे.