अचूक बातमी “तरुण भारत” ची, मंगळवार, 18 मे 2021, सकाळी 11.30
● सोमवारी रात्री अहवालात 1,310 बाधित ● लाट ओसरू लागल्याची चिन्हे ● मात्र पॉझिटिव्हिटी रेट हाय 33.86● अँटीजन टेस्टमध्ये 1,044 बाधित ● सविस्तर माहिती काही वेळातच ● प्रत्यक्ष हॉस्पिटलमध्ये 3,575 रुग्ण ● पॉझिटिव्हिटी रेट खाली येण्याची गरज ● पुरवठा नसल्याने लसीकरण गती कमी
सातारा / प्रतिनिधी :
गेल्या 4 दिवसांत बाधित होण्यापेक्षा मुक्त होण्याचा आकडा जास्त झाला आहे. जिह्यात एकूण 3,575 रुग्ण प्रत्यक्ष दवाखान्यात तर 17 हजार 753 रुग्ण घरी उपचार घेत आहेत. अशा दिलासादायक वातावरणातून पुढे जात असताना रविवारी रात्रीच्या अहवालात 880 बाधित समोर आले मात्र पॉझिटिव्हिटी रेट मोठा आहे. तो कमी करावयास प्रयत्न करावे लागणार आहेत तर सोमवारी रात्रीच्या अहवालाने देखील दिलासा दिला असून सलग दुसऱ्या दिवशी बाधित वाढ घटली असून 1,310 जणांचा अहवाल बाधित आलेला आहे.
अँटीजन टेस्टमध्ये पॉझिटिव्हिटी रेट जास्त
सोमवारी रात्री च्या अहवालानुसार 3,869 यांची तपासणी केलेली आहे पैकी त्यामध्ये 2,822 जणांची एंटीजन टेस्ट करण्यात आलेली असून त्यापैकी 1,044 जणांचा अहवाल बाधित आलेला आहे. अँटीजन टेस्टचा पॉझिटिव्हिटी रेट 37 टक्के एवढा आहे तर 1,047 जणांची rt-pcr टेस्ट केल्यानंतर 266 जणांचा अहवाल बाधित आलेला असून या टेस्टची पॉझिटिव्हिटी 25.41 टक्के आहे. त्यामुळे एकूण पॉझिटिव्हिटी रेट 33.86 असून तो देखील हायच आहे. तो कमी करण्यासाठी जिल्ह्याला प्रयत्न करावे लागणार आहेत.
आता मृत्यू दर कमी होण्याची खरी गरज
वास्तविक, कमी होणारी दुसरी लाट म्हणजे केवळ स्टॅटिस्टिक म्हणजे आकडेवारीचा खेळ आहे. आकडे कमी होत असल्याचे वास्तव असले तरी मृत्युदर कमी करणे हाच मोठा उद्देश असला पाहिजे. याच 4 दिवसांत एकूण 150 बळी गेले असल्याने तो दर अद्याप कमी होत नसल्याचे विदारक सत्य आहे. बाधित वाढ थांबावी व मृत्यूदर कमी व्हावा अशी प्रार्थना जिल्हावासिय सध्या करत आहेत.
सोमवारी रात्री अहवालात 1,310 बाधित
दोन हजारांच्या पटीत सुरू असलेली बाधित वाढ जिल्हावासीयांना छळत होती. गेल्या दोन दिवसात ती अठराशे खाली आली. गती मंदावल्याचा दिलासा असतानााच सोमवारी रात्रीच्या अहवालात देखील 1,310 एवढ्या कमी संख्येने बाधित समोर आले आहेत. मात्र या अहवालानुसार एकूण 3 हजार 869 जणांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी 1,310 जणांचा अहवाल बाधित आलेला असून पॉझिटिव्हिटी रेट 33.89 असा हाय लेव्हल वर आहे.
पुरवठा कमी : लसीकरण गती कमी
जिल्हय़ात आता लसीकरणाचे नियम बदलून टाकले आहेत. कोव्हॅक्सिन तर उपलब्ध नसल्याचे सांगण्यात येतेय तर कोव्हिशिल्डचे लसीकरण सुरु आहे. सोमवारी जिल्हय़ात 881 जणांना लस देण्यात आलीय. यामुळे पहिला डोस घेण्याची एकूण संख्या 5 लाख 70 हजार 309 झाली आहे. तर आतापर्यंत 1 लाख 13 हजार 834 जणांनी लस घेतल्याने एकूण जिल्हय़ात एकूण लस घेणाऱयांची संख्या 6 लाख 84 हजार 143 एवढी झालीय.
मंगळवारी प्राप्त आकडेवारी नमुने : 3 हजार 869 बाधित : 1,310
सोमवारपर्यंत जिल्हय़ात एकूण नमुने -6,41,908 एकूण बाधित -1,37,424 घरी सोडण्यात आलेले -1,12,623 मृत्यू -3,223 उपचारार्थ रुग्ण-21,690
सोमवारी जिल्हय़ात बाधित 880, मुक्त 1,416, बळी 38