ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
सलग सहाव्या दिवशी शुक्रवारी पेट्रोलची किंमत प्रति लिटर 57 पैसे आणि डिझेलच्या किंमतीत प्रति लिटर 59 पैसे वाढ झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मागील सहा दिवसात पेट्रोलचे भाव 3.31 रुपयांनी तर डिझेल चे भाव 3.42 रुपये इतके वाढले आहेत. शुक्रवारी पुन्हा भाव वाढल्यानंतर दिल्लीत पेट्रोलची किंमत 74 रुपयांवरून 74.57 रुपये प्रति लिटर इतकी झाली आहे. तर डिझेलची किंमत 72.22 रुपयांवरून 72.81 रुपये झाली आहे.
कोलकत्ता, मुंबई आणि चेन्नईमध्ये एक लिटर पेट्रोलची किंमत अनुक्रमे 76.48, 81.53 आणि 78.47 रुपये झाली आहे . तर डिझेलच्या किंमतीत देखील वाढ झाल्याने या महानगरांना आता अनुक्रमे 68.70, 71.48 आणि 71.14 रुपये मोजावे लागणार आहेत.
कोरोना संकटाबरोबरच सलग सहाव्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत वाढ झाल्याने सर्व सामान्यांना महागाईचा झळ सहन करावी लागणार आहे. पेट्रोल डिझेल मध्ये सतत वाढ झाल्यावर नेटकऱ्यांनी सरकार विरोधात नाराजी व्यक्त केली. तर ट्विटर वर सध्या 3.31 हा हॅशटॅग ट्रेंड होताना दिसत आहे.