नायडू गँगच्या शार्प शूटरची कबुली
ऑनलाईन टीम / मेरठ :
प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता सलमान खानला मारण्यासाठी 30 लाखांची सुपारी घेतल्याची कबुली नायडू गँगच्या एका शार्प शूटरने दिली आहे.
रवी भूरा असे या शार्प शूटरचे नाव आहे. मागील आठवडय़ात उत्तरप्रदेश पोलिसांनी कंकरखेडामध्ये दीड लाखांचा इनाम असलेल्या शिवशक्ती नायडूला एन्काऊंटरमध्ये मारले होते. त्याचा रवी भूरा साथीदार आहे. तो उत्तर प्रदेश पोलिसांच्या एन्काऊंटरमधून निसटला होता. त्यानंतर शुक्रवारी पायाला गोळी लागल्याने त्याला अटक केली असता त्याने काही धक्कादायक खुलासे केले आहेत.
जानेवारी 2018 मध्ये जोधपूर न्यायालयात हजर झालेल्या सलमानची हत्या करण्यात येणार होती. राजस्थानचा गँगस्टर संपत नेहरासोबत मिळून मी सलमानला मारणार होतो. त्यासाठी मला 30 लाखांची सुपारी देण्यात आली होती, असा खुलासा रवी भूरा याने केला आहे. अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा याच्या कार्यालयातूनही त्याने 8 कोटी रुपये लुटले होते.
दल्लीचे एसीपी ललित मोहन नेगी यांनी शिवशक्ती नायडूवर मोक्का लावला होता. त्यामुळे त्यांनाही संपवायचे होते, असेही त्यांने सांगितले. रवीच्या या दाव्यामुळे त्याची चौकशी करण्यात येणार असल्याचे पोलीस महासंचालक प्रशांत कुमार यांनी सांगितले