ऑनलाईन टीम / मुंबई :
अभिनेता सलमान खानला विमानतळावर रोखणारा सीआयएसएफ जवान अडचणीत सापडला आहे. या प्रकारानंतर या जवानाचा मोबइल जप्त करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तपासणीशिवाय विमानतळावर प्रवेश करणाऱया सलमान खान याला अडविणाऱया सीआयएसएफचे एएसआय सोमनाथ मोहंती यांचा मोबाइल जप्त केला आहे.
सलमान खान आपल्या आगामी चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी रशियाला रवाना होण्यासाठी मुंबई विमानतळावर पोहोचला होता. त्यावेळी त्याला छायाचित्रकार आणि चाहत्यांनी गराडा घातला. त्यामुळे मोठी गर्दी झाली. सलमान कोणतीही तपासणी न करता विमानतळावर जात होता. त्यावेळी त्याला एएसआय सोमनाथ मोहंती यांनी अडविले. सलमानने देखील कोणतेही आढेवेढे त्यांच्या सूचनांचे पालन केले. संपूर्ण तपासणी होईपर्यंत सलमानला विमानतळाच्या दारात उभे रहावे लागले. हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला. चोखपणे कर्तव्य बजावणाऱया मोहंती यांचे प्रचंड कौतुक होत आहे.
दरम्यान, एका अधिकाऱयाने सांगितले की सलमानला विमानतळावर थांबवल्यानंतर सोमनाथ मीडियाशी बोलले होते. हे प्रोटोकॉलचे उल्लंघन असल्याचे त्या अधिकाऱयाने सांगितले आहे. सोमनाथ यांनी या पुढे कोणत्याही मीडिया हाऊसशी बोलू नये, म्हणूनच त्यांचा फोन जप्त करण्यात आला आहे.