बेळगाव / प्रतिनिधी
मोबाईल आणि इंटरनेटमध्ये हरवलेल्या तरुणाईला देव, देश आणि धर्मरक्षणाचे धडे देणारी दुर्गामाता दौड चौथ्या दिवशी अमाप उत्साहात पार पडली. छत्रपती शिवाजी महाराज की जय, धर्मवीर संभाजी महाराज की जय, यासह ‘धर्मासाठी झुंजायचं, देशासाठी मरायचं रं’ अशा स्फूर्तिगीतांनी शहर परिसरात चैतन्यमय वातावरण निर्माण झाले. पांढरा पोषाख, टोप्या आणि भगव्या फेटय़ांसह दौडमध्ये सहभागी होणाऱया धारकऱयांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे.
चौथ्या दिवशी दौडला नेहरूनगर येथील बसवाण्णा महादेव मंदिरापासून सुरुवात झाली. माळमारुती पोलीस स्टेशनचे सीपीआय सुनील पाटील यांच्या हस्ते ध्वजपूजन झाले. सुधीर गाडगीळ यांच्या हस्ते आरती करून दौडला प्रारंभ झाला. गुरुवारच्या नेहरूनगर परिसरात झालेल्या दौडमध्ये हजारो तरुण-तरुणी व आबालवृद्ध उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. कोरोनामुळे दोन वर्षे दुर्गामाता दौड मर्यादित स्वरुपात झाली. काही मोजक्मयाच धारकऱयांच्या उपस्थितीत दुर्गामाता दौड झाली होती. मात्र, यंदा दोन वर्षांनंतर दौडमध्ये सहभागी होणाऱया तरुणाईची संख्या आणि उत्साह अमाप वाढला आहे. दौड मार्गावर जागोजागी छत्रपती शिवाजी महाराजांचा जीवनपट देखाव्यांतून उलगडला जात आहे. त्यामुळे तरुणाईचा उत्साह अधिक वाढत आहे.
सदाशिवनगर येथील बसवाण्णा मंदिरापासून सुरुवात होऊन सदाशिवनगर, हरिदा गणेश मंदिर, आंबेडकर नगर, गणेश चौक, मरगाई मंदिर, नेहरूनगर, रामदेव हॉटेल, रामनगर, दुर्गामाता रोड, अशोकनगर, सुभाषनगर, शिवबसवनगर, जोतिबा मंदिर येथे सांगता झाली.
रामनगर, सदाशिवनगरमध्ये जल्लोषी स्वागत
सदाशिवनगरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची गाणी म्हणत फुलांचा वर्षाव करण्यात आला. शिवाय दौड मार्गावर रांगोळय़ा काढून ठिकठिकाणी महिलांनी दौडचे औक्षण करून पूजन केले. दरम्यान, फटाक्मयांची आतषबाजी करून जल्लोषी स्वागत करण्यात आले. यामुळे परिसरात चैतन्याचे वातावरण निर्माण झाले होते.
शनिवार दि. 1 रोजीचा दौडचा मार्ग
संभाजी चौक येथून दौडला प्रारंभ होणार आहे. किर्लोस्कर रोड, रामलिंग खिंड गल्ली, अशोक चौक, बसवाण गल्ली, लक्ष्मी मंदिर, नरगुंदकर भावे चौक, गणपत गल्ली, कडोलकर गल्ली, बुरुड गल्ली, भातकांडे गल्ली, बुरुड गल्ली, मेणसी गल्ली, आझाद गल्ली, टेंगीनकेरा गल्ली, भोई गल्ली, बापट गल्ली, पांगुळ गल्ली, टेंगीनकेरा गल्ली, कामत गल्ली, पी. बी. रोड, मार्केट पोलीस स्टेशन, शेट्टी गल्ली, भडकल गल्ली, कोर्ट कॉर्नर, सरदार्स ग्राउंड रोड, सन्मान हॉटेल, कॉलेज रोड, यंदे खुट, किर्लोस्कर रोड, कडोलकर गल्ली, बापट गल्ली, संयुक्त महाराष्ट्र चौक, मारुती मंदिर येथे सांगता होईल.
शहापूर विभागाची आज बैठक
शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्यावतीने शहापूर विभागाची बैठक शुक्रवार दि. 30 रोजी रात्री ठीक 8 वाजता श्री गणेश मंदिर, लक्ष्मी रोड, नाथ पै सर्कल, शहापूर येथे होणार आहे.