प्रतिनिधी/ बेळगाव
एका सव्वापाच वर्षीय बालिकेवर लैंगिक अत्याचाराची घटना घडली आहे. वीरभद्रनगर परिसरात घडलेल्या या घटनेने एकच खळबळ माजली असून मार्केट पोलीस स्थानकात पोक्सो कायद्यांतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
गेल्या 15 दिवसांपूर्वी ही घटना घडली आहे. 25 ऑक्टोबर रोजी रात्री एका नराधमाने सव्वापाच वषीय बालिकेवर लैंगिक अत्याचार केल्याचे उघडकीस आले आहे. यासंबंधी मार्केट पोलीस स्थानकात भा.दं.वि. 363, 376(एबी), 506, 509 व पोक्सो कायद्यांतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
सोमवारी सायंकाळी त्या बालिकेला वैद्यकीय तपासणीसाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली आहे. मार्केटचे पोलीस निरीक्षक संगमेश शिवयोगी पुढील तपास करीत आहेत. 33 वषीय मुबारक मुल्ला या युवकाने हे कृत्य केले असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.