ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
सशस्त्र सीमा दलात हवालदार पदासाठी 1522 जागांची भरती करण्यात येणार आहे. त्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. उमेदवारांनी 10 सप्टेंबरपर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करणे आवश्यक आहे.
हवालदार पदासाठी 18 ते 27 अशी वयोमर्यादा ठेवण्यात आली आहे. लेखी परीक्षा, शारीरिक दक्षता, मेडिकल चाचणीआणि मुलाखतींद्वारे योग्य उमेदवारांची निवड होईल. पात्र उमेदवारांची केंद्र सरकारच्या गृह खात्यांतर्गत असलेल्या सरकारी नोकरीत नोंद होईल. तसेच त्यांना 21,700 ते 69,100 रुपये वेतन देण्यात येणार आहे.
अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, निवृत्त सैन्य दलातील वारसांना व महिलांना या भरतीसाठी मोफत अर्ज करता येणार आहे. मागास प्रवर्गासाठी 100 रुपये परीक्षा फी असणार आहे.