ऑनलाईन टीम / पुणे :
ससून सर्वोपचार रुग्णालयात लैंगिक अत्याचार पीडितांना साह्यासाठी एक खिडकी योजनेचे उदघाटन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एन. पी. धोटे साहेब यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले उपस्थित होते.
यावेळी बोलताना अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले म्हणाले की, एक खिडकी योजनेमध्ये (वन स्टॉप सेंटर ) बलात्कार, बालकांवरील लैंगिक अत्याचार व असिड हल्ला यामध्ये बळी पडलेल्या महिला आणि बालकांना वैद्यकीय सल्ला, समुपदेशन, अर्थसाह्य व कायदेशीर सल्ला आणि पुनर्वसन करण्यासाठी मनोधैर्य योजना कार्यान्वित करण्यात येणार आहे.
ससून तर्फे एका छत्राखाली स्त्रीरोगशास्त्र, बालरोगशास्त्र, बालरोगशल्य चिकित्साशास्त्र मनोविकारशास्त्र, प्लास्टिक सर्जरी व न्यायवैद्यकशास्त्र या विभागातील तज्ञ डॉक्टरांचा सल्ला दिला जाईल. तसेच पुणे जिल्हा विधिसेवा प्राधिकरन यांचे तर्फे मोफत कायदेशीर सल्ला दिला जाणार आहे.