वृत्त संस्था/ होवे
2022 इंग्लिश कौंटी क्रिकेट हंगामासाठी ससेक्स क्रिकेट क्लबने ऑस्ट्रेलियाच्या ट्रेव्हिस हेडसह नवा करार केला असून त्याची या हंगामासाठी संघाच्या कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
2022 इंग्लीश कौंटी क्रिकेट स्पर्धेत ससेक्सच्या पहिल्या सामन्यापूर्वी हेड लंडनमध्ये दाखल होणार आहे. ससेक्सच्या प्रमुख प्रशिक्षकपदी सॅलीसबेरी कार्यरत आहेत. 27 वर्षीय हेडने शेफिल्ड शील्ड क्रिकेट स्पर्धेत खेळताना तीन सामन्यात 163 धावा जमविल्या. गेल्या महिन्यात झालेल्या मार्श चषक वनडे क्रिकेट स्पर्धेत हेडने दक्षिण ऑस्ट्रेलिया संघाकडून खेळताना 127 चेंडूत 230 धावा जमवित आपल्या संघाला क्विन्सलॅडवर शानदार विजय मिळवून देण्यात हातभार लावला होता.