ऑनलाईन टीम / पुणे :
सहकारनगर परिसरातील तळजाई वसाहतीत मध्यरात्री एका टोळक्याने 30 ते 35 वाहनांची तोडफोड केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास तळजाई वसाहतीत अज्ञात टोळक्याने लाकडी दांडके आणि कोयत्याच्या सहाय्याने 30 ते 35 वाहनांची तोडफोड केली. यामध्ये 3 रिक्षा, कार आणि दुचाकी वाहनांचा समावेश आहे. तळजाई वसाहतीतील गणपती मंदिराजवळील गल्ली नंतर 24 मध्ये ही घटना घडली.
या टोळक्याचा अर्धा ते पाऊण तास हैदोस सुरू असतानाही नागरिक भीतीमुळे बाहेर पडले नाहीत. स्थानिकांनी पोलिसांना याची माहिती दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र, तोपर्यंत हे टोळके पसार झाले. असाच एक प्रकार पिंपरीतील थरमॅक्स चौक, अजंठानगर येथेही घडला असून, तिथे 10 ते 12 वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे.