प्रतिनिधी / कोल्हापूर
सहकार महर्षी तात्यासाहेब मोहिते यांच्या पुण्यातिथी निमित्त शेतकरी संघ येथे प्रतिमा पूजन करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी चेअरमन जी. डी. पाटील यांच्या हस्ते प्रतिमा पूजन झालेनंतर त्यांनी मोहिते यांच्या कार्याला उजाळा दिला. तात्यासाहेब मोहिते यांनी संघाला दिशा देण्याचे काम केले. त्यांनी दिलेल्या विचारावरच आज संघाची वाटचाल सुरु आहे. कर्मचाऱ्यांच्यावतीने मुख्य व्यवस्थापक आप्पासो निर्मळ, संघटनेचे प्रमुख दीपक निंबाळकर यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
यावेळी व्हाईस चेअरमन बाबासाहेब पाटील भुयेकर, माजी चेअरमन अमरसिंह माने, व्यंकप्पा भोसले आदी संचालक उपस्थित होते. यावेळी २५ वर्षे सेवा कालावधी पूर्ण केलेल्या कर्मचाऱ्यांचा भेट वस्तू देवून सत्कार करण्यात आला.