नवी दिल्ली /प्रतिनिधी
केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्या नेतृत्त्वात देशातील पहिलं सहकार संमेलन राजधानी दिल्लीतील इंदिरा गांधी इनडोअर स्टेडियममध्ये (INDIRA GANDHI INDOOR STADIUM) या संमेलनाचं आयोजन करण्यात आलं आहे. देश-विदेशातील कोट्यवधी लोक ऑनलाईन पद्धतीने या संमेलनात सहभागी होऊ शकतात. देशाचे पहिले सहकार मंत्री अमित शाह यांनी यावेळी उपस्थितांना संबोधित केलं. यावेळी बोलताना अमित शाह यांनी देशातील सहकार (Cooperat) मजबूत करणं हे आपलं ध्येय असल्याचं म्हंटल.
नवीन सहकार मंत्रालयाचे प्रभारी मंत्री अमित शाह यांनी यावेळी संबोधीत करताना म्हणाले, सर्वप्रथम पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra ModiPrime Minister of India) यांचे धन्यवाद. त्यांनी मला देशाचा पहिला सहकार मंत्री म्हणून निवडलं. देशातील सहकार मजबूत करणं हे आपलं ध्येय आहे. गरिबांचं कल्याण आणि विकास हे सहकाराशिवाय शक्य नाही. गावांना समृद्ध करणं हे सहकारामुळे शक्य आहे. सह आणि कार्य म्हणजे सहकार आहे. एका दिशेने काम केल्यास गरिबांचं कल्याण शक्य करणं आहे. सहकारामध्ये प्रचंड ताकद आहे. सहकारातून समृद्धी हा मोदींनी नारा दिला आहे. मोदींचं ५ ट्रिलियन डॉलरच्या अर्थव्यवस्था गाठण्यासाठी सहकार क्षेत्र जोर लावेल सहकार क्षेत्राची आर्थिक ताकद कमी असेल पण मानवी एकतेची ताकद मोठी आहे.