ऑनलाईन टीम / पुणे :
वारजे येथील भाजपाचे सक्रीय कार्यकर्ते तसेच स्वीकृत नगरसेवक सचिन दशरथ दांगट यांची भाजपा सहकार आघाडी च्या पुणे शहर अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पुणे शहर अध्यक्ष माजी आमदार जगदीश मुळीक यांनी नियुक्तीचे पत्र सचिन दांगट यांना दिले.
याप्रसंगी शहराध्यक्ष संघटनमंत्री रवि अनासपुरे, संघटन सरचिटणीस राजेश पांडे, सरचिटणीस गणेश घोष, दीपक पोटे, दीपक नागपुरे, प्रवक्ते धनंजय जाधव, विकास लवाटे,दक्षिण भारतीय आघाडीचे राजेश पिल्ले,भाजपा शहर पदाधिकारी यांचेसह सहकार आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गेली 5 वर्षे सचिन दांगट हे पुणे पालिकेचे स्वीकृत सभासद म्हणुन काम करीत आहेत.
2017 साली झालेल्या पुणे महानगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्र 32 मधुन पराभवाला सामोरे गेल्यानंतर सातत्याने समाजोपयोगी कार्यक्रम राबविण्यात ते कायम अग्रेसर आहेत.
कोरोनाचे काळात सत्तेत नसताना हजारो लोकांना कोरडा शिधा वाटप, औषधे वाटप, 4000 परप्रांतीय नागरिकांना डॅाक्टर फिटनेस सर्टीफिकेट, पोलीस पासेस व्यवस्था असे अनेक मदतीचे कार्यक्रम तसेच पक्षाचे दिलेले सर्व कार्यक्रम भाजपाचे वतीने घेतले आहेत.
यापुर्वी पुणे महानगरपालिका प्रभाग क्र 32 चे भाजपाचे उमेदवार, सरचिटणीस खडकवासला विधानसभा मतदार संघ, स्वीकृत सभासद पुणे मनपा यांचेसह अनेक सामाजिक संस्थाचे पदाधिकारी म्हणुन त्यांनी उल्लेखनीय काम केले आहे.
समाजोपयोगी आणि नाविन्यपुर्ण उपक्रम राबविणारा हाडाचा कार्यकर्ता म्हणुन सचिन दशरथ दांगट यांची ओळख आहे.