मंत्री गोविंद गावडे यांची माहिती
प्रतिनिधी /पणजी
सहकार खात्यातर्फे सहकार क्षेत्रात भरीव कामगिरी केलेल्यांना 2019-2020 आणि 2020-2021 अशा दोन वर्षांचे पुरस्कार येत्या 21 रोजी राजीव गांधी कलामंदिर फोंडा येथे सकाळी 10.30 वा. प्रदान करण्यात येणार आहे. सहकार क्षेत्रात काम करणाऱयांना प्रोत्साहन देण्यासाठी ऊर्जा मिळावी यासाठी पुरस्कार जाहीर करण्यात आले आहे अशी माहिती सहकारमंत्री गोविंद गावडे यांनी पणजीत आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी प्रकाश वेळीप, किसन फडते, कांता पाटणेकर, मधुकर कुंकळय़ेकर, वल्लभ साळकर, साहाय्यक रजिस्ट्रार महात्मे, सहकार निबंधक कुटकर उपस्थित होते.
दोन वर्षे कोरोना काळामुळे पुरस्कार सोहळय़ात खंड पडला होता. सहकार क्षेत्र हा अखंड कणा आहे. 2019-2020 गोवा सहकार रत्न उच्च पुरस्कार 1 लाख 25 हजार रूपये रोख रक्कम, शाल, श्रीफळ, स्मृतीचिन्ह देण्यात येणार तसेच दुसरा पुरस्कार सहकारभूषण यात 75 हजार रोख शाल, श्रीफळ, स्मृतीचिन्ह देण्यात येणार तर तिसरा गोवा सहकारश्री यात 50 हजार रोख शाल, श्रीफळ, स्मृतीचिन्ह देण्यात येणार आहे. 2019-2020 या सालासाठी गोवा सहकाररत्न हा पुरस्कार प्रकाश वेळीप यांना प्रदान करण्यात येणार आहे. सहकारभूषण आर्किटेक्ट उमेश शिरोडकर, गोवा सहकारश्री श्रीकांत नाईक यांना प्रदान करण्यात येणार आहे. गोवा सहकार साहाय्यक पुरस्कार सुलभा जल्मी आणि आगापूर येथील चंद्रकांत गावडे यांना तर द शिरोडा प्रोग्रेसिव्ह अर्बन को ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी शिरोडाला उत्कृष्ट सहकार संस्था म्हणून पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. तसेच सहकार क्षेत्रात उत्तम कामगिरी केलेल्या द बिचोलीम गर्व्हनमेंट एम्पॉलईज को ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी डिचोली आणि द मडगाव स्कूल कॉम्प्लेक्स को ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी मडगाव यांना पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
2020-21सालासाठी गोवा सहकार रत्न मार्शेल अर्बन क्रेडिट सोसायटीचे ऍड. विनायक नार्वेकर, सहकारभूषण विठ्ठल वेर्णेकर, गोवा सहकारश्री सुभाष हळर्णकर यांना पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. तसेच द गोवा अर्बन असिस्टंट पुरकार बाणावली दुध सहकार को ऑपरेटिव्ह सोसायटी बाणावलीच्या फ्लोरी फारिया आणि आगोंदेश्वर दूध उत्पादक सोसायटीचे शिवाजी नाईक गावकर यांना प्रदान करण्यात येणार आहे. द दीनदयाळ मल्टिपर्पज को ऑपरेटिव्ह सोसायटी डिचोली यांना उत्कृष्ट सहकार संस्था म्हणून पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. सहकार क्षेत्रात उत्तम कामगिरी केलेल्या गोवा शिपयार्ड एम्पलॉईज को ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी वास्को आणि द गोवा को ऑपरेटिव्ह डिपार्टमेंट एम्पलॉईज को ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी पणजी या दोन संस्था पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे असे मंत्री गोविंद गावडे यांनी यावेळी सांगितले.
सहकार क्षेत्रात मरगळ दूर करण्यासाठी सल्लागार समिती होणे आवश्यक आहे. तसेच गोमंतकीय तरूणांनी सहकार क्षेत्रात सहभाग नोंदविणे आवश्यक आहे असे गावडे यांनी सांगितले.