प्रतिनिधी / कुंकळ्ळी
बाळळी-केपे येथील (मूळ कसबा, नंदगड-खानापूर) जिजाबाई हणमंत पाटील (वय वर्षे 73) यांचे अल्पआजाराने मंगळवार 15 रोजी रात्री निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर बुधवार 16 रोजी सकाळी मडगावच्या हिंदू स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्यापश्चात दोन विवाहित पुत्र व दोन मुली, स्नुषा, जावई, नातवंडे असा परिवार आहे. बाळ्ळी येथील निवृत्त सरकारी शिक्षक स्व. हणमंत पाटील यांच्या त्या पत्नी, तर काणकोण वीज कार्यालयातील कर्मचारी सुभाष पाटील यांच्या त्या आई होत.