वृत्तसंस्था/ दिफू
आसामच्या दिफू भागात सहा कोटीचे हेरॉईन जप्त करण्यात आले आहे. एका नागालँडच्या जोडप्याकडे ते सापडले होते. आसामच्या पश्चिम कार्बी अँगलाँग जिल्हय़ात झडती घेत असताना हे हेरॉईन सापडले. या अंमली पदार्थाची 150 पॅकेटस् जप्त करण्यात आली असून त्यांचे वजन 2 किलो असल्याचे सांगण्यात आले. नागालँडमधील दिमापूर येथून हे अंमली पदार्थ आणण्यात आले होते, असे प्राथमिक तपासात आढळले आहे. पुढील चौकशी सुरू आहे.