अचूक बातमी “तरूण भारत”ची, रविवार 13 फेब्रुवारी 2022, सकाळी 10.30
● सर्वात कमी नव्याने बाधित वाढ कोरेगाव तालुक्यात
● महाबळेश्वर, पाटणमध्ये नव्याने केवळ पाचजण बाधित
● जिल्हा सावरु लागला
● नव्याने जिह्यात 101 जण बाधित
प्रतिनिधी / सातारा :
जिल्ह्यातील बाधित वाढीचे प्रमाण आता घटू लागले आहे. फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या बारा दिवसांमध्ये जिल्ह्यासाठी दिलासादायक असे चित्र तयार झालेले आहे. रविवारी सकाळी जाहीर झालेल्या अहवालात जिल्ह्यात नव्याने 101 बाधितांची भर पडली आहे. शनिवारी दिवसभरात 2317 जणांचे स्वॅब घेतले होते. जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी रेट 4.36 वर आलेला आहे. सर्वच तालुक्यांमध्ये आता परिस्थिती आटोक्यात येवू लागली आहे. सहा तालुक्यांमध्ये बाधित वाढ ही दहाच्या आतमध्ये आलेली आहे.
सहा तालुके 10 च्या आतमध्ये
जिल्ह्यातील अकरा तालुक्यांमध्ये आता कोरोना बाधित वाढ ही कमी होत असल्याचे चित्र आहे. नव्याने बाधित आढळून येणाऱ्यांची संख्या ही सर्वच तालुक्यांमध्ये कमी आहे. त्यामध्ये सर्वात जास्त सातारा तालुक्यामध्ये असून सातारा तालुक्यात 21, खटाव तालुक्यात 14, कराड तालुक्यात 13, फलटण तालुक्यात 12, माण तालुक्यात 10, वाई तालुक्यात 9, खंडाळा तालुक्यात 6, महाबळेश्वर तालुक्यात 5, पाटण तालुक्यात 5, कोरेगाव तालुक्यात 4 असे जिल्ह्यात 99 तर इतर 2 असे 101 बाधित आढळून आले आहेत. सर्वात कमी बाधित हे कोरेगाव तालुक्यात आढळून आले आहेत.
बरे होवून घरी जाणाऱ्यांची संख्या चांगली
जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांचे प्रमाण पूर्णपणे रोखण्यात जिल्हा आरोग्य यंत्रणेला यश आलेले आहे. आरोग्य यंत्रणा करत असलेल्या प्रयत्नामुळे योग्य उपचारामुळे ठणठणीत बरे होवून घरी जाणाऱ्यांची संख्या चांगली आहे. सक्रीय रुग्ण जिल्ह्यात एक हजाराच्या आसपास आहेत. त्यातील दीडशे जण हे हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असून रिकव्हरी रेट हा 96.92 च्या दरम्यान आहे. जिल्ह्यासाठी दिलासादायक बाब आहे.
रविवारी
नमूने-2317
बाधित-101
रविवारपर्यंत
नमूने-25,31,171
बाधित-2,78,601
मृत्यू-6,653
मुक्त-2,69,924