अचूक बातमी “तरुण भारत”ची, शुक्रवार, 10 डिसेंबर, 2021 सकाळी 11.20
● डिसेंबरच्या दहा दिवसातील स्थिती
● कोरोना रूग्णांची अल्पवाढही चिंताजनक
● शुक्रवारी नव्याने वाढले 26 रूग्ण
● 3461 संशयितांच्या चाचण्या
● पॉझिटिव्हीटी रेट 0.75 वर
सातारा / प्रतिनिधी :
डिसेंबर महिन्याच्या सुरूवातीला जिल्ह्यात कोरोना रूग्णवाढीचा आलेख नोव्हेंबरच्या तुलनेत आणखी घसरल्याचे दिसले. मात्र डिसेंबरचा पहिले सात दिवस उलटल्यानंतर जिल्ह्यात कोरोना रूग्णांची अल्पवाढ सुरू झाली आहे. या महिन्यातील दहा दिवसाच्या आकडेवारीचा तुलनात्मक विचार केला असता 1 डिसेंबर ते 6 डिसेंबर या सहा दिवसात जिल्ह्यात एकूण 88 रूग्णांंची वाढ झाली. तर अलिकडच्या तीन चार दिवसात 89 रूग्णांची वाढ झाल्याचे दिसत आहे. रूग्णांची अल्प प्रमाणात होणारी वाढही दुर्लक्षून चालणार नाही. दरम्यान शुक्रवारी आलेल्या अहवालात नव्याने 26 रूग्णांची वाढ झाली आहे.
अल्प वाढीकडे दुर्लक्ष नको
राज्यात ओमायक्रॉनच्या रूग्णांची संख्या वाढते की काय यावर चर्चा सुरू असतानाच सातारा जिल्ह्यात मात्र रूग्णवाढीला घसरण लागली होती. मात्र गेल्या चार दिवसात अल्प रूग्णवाढ लक्षवेधी ठरत आहे. 7 डिसेंबरला जिल्ह्यात फक्त 7 रूग्णांची वाढ झाली. 8 डिसेंबरला त्यात चौपट वाढ होऊन 27 रूग्ण झाले. 9 डिसेंबरला 36 रूग्णांची वाढ झाली तर 10 डिसेंबरला आलेल्या अहवालात 26 रूग्णांची वाढ झाली आहे.
संशयितांच्या चाचण्याही वाढल्या
जिल्ह्यात रूग्णांची अल्पवाढ सुरू असतानाच चाचण्यांची संख्याही वाढली आहे. 10 डिसेंबरला आलेल्या अहवालात 3461 संशयितांच्या चाचण्या झाल्या आहेत. 9 डिसेंबरला आलेल्या अहवालात 2920 संशयितांच्या चाचण्या झाल्या आहेत तर 8 तारखेच्या अहवालात 2686 संशयितांच्या चाचण्या वाढल्या आहेत. चाचण्यांची संख्याही या आठवड्यात वाढल्याचे दिसत आहे. ओमायक्रॉनच्या पार्श्वभुमीवर जिल्हा प्रशासन अलर्ट झाले असून चाचण्यांची संख्या वाढलेली दिसत आहे.
गुरूवारी जिल्हय़ात
नमुने-3461
बाधित-26
मृत्यू-00
उपचारार्थ-172
मुक्त-11
गुरूवारपर्यंत जिल्हय़ात
नमुने-23,23,725
बाधित-2,52,036
मृत्यू-6,483
मुक्त-2,44,621