दोघा जणांना अटक, हारुगेरी पोलिसांची कारवाई, खुनानंतर कणकुंबीजवळ पुरला मृतदेह
प्रतिनिधी/ बेळगाव
प्रेम प्रकरणातून एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करुन तिचा खून करण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणी हारुगेरी (ता. रायबाग) पोलिसांनी दोघा जणांना अटक केली असून सहा महिन्यानंतर खुनाचा हा प्रकार उघडकीस आला आहे. खुनानंतर त्या मुलीचा मृतदेह कणकुंबी (ता. खानापूर) जवळ पुरण्यात आल्याचे उघडकीस आले आहे.
नोव्हेंबर 2019 मध्ये हारुगेरी पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रातील एका अल्पवयीन मुलीचे अपहरण झाले होते. या प्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आला होता. जिल्हा पोलीस प्रमुख लक्ष्मण निंबरगी, अतिरिक्त जिल्हा पोलीस प्रमुख अमरनाथ रेड्डी, अथणीचे पोलीस उपअधीक्षक एस. व्ही. गिरीश, रायबागचे मंडल पोलीस निरीक्षक के. एस. हट्टी आदी वरि÷ अधिकाऱयांच्या मार्गदर्शनाखाली हारुगेरीचे पोलीस निरीक्षक यमनाप्पा मांग व त्यांच्या सहकाऱयांनी या प्रकरणाचा छडा लावला आहे.
या प्रकरणी आदर्श दत्तु पार्थनहळ्ळी (वय 24) व त्याचा मित्र किरण केंचाप्पा जगदाळ (वय 24, दोघेही रा. हिडकल, ता. रायबाग) अशी अटक करण्यात आलेल्या दोघा जणांची नावे आहेत. खून झालेल्या अल्पवयीन मुलीबरोबर आदर्शचे प्रेम प्रकरण सुरू होते. शिक्षणानिमित्त आदर्श धारवाडला राहत होता. नोव्हेंबर 2019 मध्ये त्या अल्पवयीन मुलीचे अपहरण करुन मे 2020 पर्यंत तिला धारवाडला ठेवण्यात आले होते. आदर्श व ती अल्पवयीन मुलगी धारवाडमध्ये एकत्र रहात होते.
मे 2020 अखेरीस आदर्शने त्या अल्पवयीन मुलीला निपाणीजवळील एका गावात वास्तव्यास असलेल्या आपल्या नातेवाईकांच्या घरी ठेवले होते. त्याचवेळी या मुलीने दुसऱया मुलाबरोबर लग्न करण्याची तयारी केल्याची माहिती आदर्शला मिळाली. किरण व आणखी एका अल्पवयीन मुलाबरोबर मिळून 9 जून 2020 रोजी मोटारसायकलवरुन त्या मुलीचे अपहरण करण्यात आले. कणकुंबी जवळील जंगलात खून करुन तिचा मृतदेह पुरण्यात आल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे.
खुनापूर्वी दारू पाजली
त्या अल्पवयीन मुलीचा खून करण्यापूर्वी तिला दारू पाजण्यात आली होती. त्यानंतर कोयत्याने गळा चिरुन पुरावे नष्ट करण्यासाठी जंगलात तिचा मृतदेह पुरण्यात आला. हा प्रकार उघडकीस येताच बिम्समधील फॉरन्सीक तज्ञांच्या मदतीने व प्रांताधिकाऱयांच्या उपस्थितीत मृतदेह बाहेर काढण्यात आला असून केवळ सांगाडा हाती लागला आहे, अशी माहिती जिल्हा पोलीस प्रमुख लक्ष्मण निंबरगी यांनी दिली. पोलिसांनी कोयता, मोबाईल, मोटारसायकल जप्त केली आहे. हारुगेरीचे पोलीस उपनिरीक्षक यमनाप्पा मांग, हवालदार के. एच. पवार, पी. के. डोणी, राजू कटेकरी, पुरूषोत्तम नाईक, हणमंत अंबी, एच. एन. मोमीन, सदाशिव डाबोळी, शिवानंद बडीगेर आदींचा समावेश असलेल्या पथकाने ही कारवाई केली आहे.