वृत्तसंस्था/ मुंबई
देशातील सहा विविध राज्यांमध्ये सध्या मोठय़ा आजाराने त्रस्त झालेल्या सुमारे 100 लहान मुलांच्या वैद्यकीय इलाजासाठी भारताचा महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने आर्थिक मदतीचे हात पुढे केले आहेत.
सचिन तेंडुलकर इकेम नावाची भागिदारीच्या स्वरूपात आर्थिक मदत देण्यासाठी संस्थेची स्थापना केली आहे. या सहा राज्यांतील वैद्यकीय इलाज सुरू असलेल्या सुमारे 100 मुलांना या संस्थेतर्फे आर्थिक मदत दिली जात आहे. महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, आसाम, कर्नाटक, तामिळनाडू आणि आंध्रप्रदेश या राज्यांतील गरीब कुटुंबातील लहान आजारी मुलांना या संस्थेतर्फे आर्थिक मदत देण्याची योजना अंमलात आणण्यात आली आहे. सदर माहिती इकेम फौंडेशनच्या व्यवस्थापक भागिदार अमिता चटर्जी यांनी दिली.