वार्ताहर / झुआरीनगर
काल शुक्रवारी सायंकाळी अचानक आलेल्या वादळी वाऱयामुळे सांकवाळ भागात पडझड होऊन बरेच नुकसान झाले. या जोरदार वाऱयामुळे सांकवाळ भागातील जुन्वोर वाडय़ावरील उत्तम नाईक यांच्या घरासमोरील आंब्याचे झाड मोडून पडले.
हे भले मोठे आंब्याचे झाड स्कुटरवर पडले. तसेच आंब्याच्या फांदय़ा गॅरेजवर कोसळून नुकसान झाले. सुदैवाने त्यांची चारचाकी वाहने व इतर दुचाक्या बचावल्या. सांकवाळ भागातील बहुतेक आंब्याच्या झाडांना कैऱया लागल्या होत्या. या वादळी वाऱयामुळे मोठय़ा प्रमाणात कैऱया गळून पडल्या. तसेच काजु बागायतीचे बरेच नुकसान झालेले आहे. झुआरीनगर भागात काही घरांच्या पत्र्यांचे छप्पर उडाले तर घराबाहेरील इतर सामानही वादळी वाऱयाबरोबर कित्येक मिटर लांब जाऊन पडले. झुआरीनगरातील उमीया हॅबिटेट इमारतीसमोर असलेल्या कचऱयाचा ढिगारा उडून मुख्य रस्त्यावर आला.