सांखळी /प्रतिनिधी
सांखळी मतदारसंघातिल शहरात तसेच ग्रामीण भागात आज पाच दिवशीय गणपतीचे विसर्जन करण्यात येणार असून याची पूर्व तयारी सुरू झाली आहे पाळी, वेळगे, कुडणे, आमोणा, न्हावेली, सुर्ला ,हरवळे, विर्डी, गावठण, वजरी इत्यादी ठिकाणी ही स्थनिक लोकप्रतिनिधी कडून स्वछता मोहीम राबविण्यात आली आहे
पालिका क्षेत्रातील पाच दिवशीय गणेशमूर्ती विसर्जन सर्वं स्थळाची स्वछता करण्यात आली असून विधुत ची सोयही करण्यात आली आहे, तसेच गणेश विसर्जन मिरवणुकीत सहभागी होताना सुरक्षित अंतर ठेवा, आरोग्याची काळजी घ्यावी, सर्व गणपती विसर्जनाच्या ठिकाणी एकदम न आणता थोडे थोडे आणावेत, शक्मयतो गर्दि करू नये, फटाके लावताना आपली व इतरांची ही काळजी घ्यावी असे आवाहन नगराध्यक्ष राया पार्सेकर यांनी केले आहे
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ मुर्ती चे आजच विसर्जन
सांखळी बाजारातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळच्या गणेश मूर्ती चे विसर्जन ही आजच करण्यात येणार असून कोरोना महामारी मुळे यंदा हा निर्णय उत्सव समिती ने घेतला आहे संध्याकाळी विसर्जन करण्यात येईल तसेच गणेश विसर्जन येणाऱया भक्तांनी नियमांचे उल्लंघन करू नये असे सचिव सुविधा पेडणेकर यांनी कळविले आहे