प्रतिनिधी / सांखळी
मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी साखळी येथे केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री आत्मनिर्भर योजना व प्रधान मंत्री गरीब कल्याण योजना अंतर्गत धान्य वाटप तसेच गाळेधारकानी व्यवसायासाठी माफक दरात दहा हजारांची आर्थिक मदत कर्जस्वरूपात वितरित केली.
या वेळी डिचोली चे उपजिल्हाधिकारी दीपक वायगं ण कर मामलेदार प्रवीनजय पंडित, नगराध्यक्ष यशवंत माडकर ,ब्रम्हा देसाई ,रश्मी देसाई दयानंद बोर्येकार विठोबा घाडी आनंद काणेकर वि शांत चिमुलकार, शुभ दा सावाईकर विविध सरपंच पंच मंडळी उपस्तीत होते
डिचोली मामलेदार कार्यालयातर्फे आयोजित या कार्यक्रमात गरजू ना मोफत धान्य वाटप करण्यात आले तसेच अतिनिर्भर योजनेअंतर्गत स्वावलंबी होण्यासाठी गाडे धारकांना अल्प दरात दहा हजारांची कर्ज योजना वितरित केली
या वेळी करोना जागृतीसाठी विशेष वाहन सुरु करण्यात आले त्याचा शुभारंभ मुख्यमंत्र्यांनी केला.
या वेळी उपजिल्हाधिकारी दीपक वायगंणकरव मामलेदार पंडित यांनी योजनांची माहिती दिली तसेच ।प्रत्येक घटकापर्यंत योजना पोचवणार असल्याचे सांगितले
अजित गावकर यांनी सूत्रसंचालन केले.