वार्ताहर /पर्ये
हरवळे सांखळी येथे होणाऱया महाशिवरात्रीसाठी देवस्थानात जाणाऱया भाविकांसाठी सांखळी वाळपई महामार्गाजवळ हाऊसिंगबोर्ड प्रवेशद्वारावर गोकुळवाडी सांखळी येथील गुरुदास गावस मेमोरियल हायस्कुलच्या शिक्षकांनी पर्यावरणपूरक असे प्रवेशद्वार तयार केले आहे.
निसर्गात सापडणाऱया पर्यावरणपूरक अश्या वस्तूंचा यासाठी वापर करण्यात आला आहे.झाडे,पाने,फुले,वेली यांचा वापर करून व कागदाचा वापर करून प्रवेशद्वार सुशोभित केले आहे.यासाठी शिक्षक दीपक गावस,विरेंद्र माजिक,नागराज नाईक,संदीप गावस,वामन नाईक यांनी चेअरमन प्रताप गावस व व्यवस्थापिका सौ.गीता गावस यांच्या मार्गदर्शनाखाली काम केले.