प्रतिनिधी/ सांखळी
सांखळी मतदारसंघात शहर तसेच ग्रामीण भागात नाताळ सण मोठय़ा उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त ख्रिस्ती बांधवांनी घरोघरी आकर्षक विद्युत रोषणाई तसेच गोठा तयार करून येशू जन्म देखावा केला आहे. स्टार कंदील लावण्यात आला आहे.
मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी सर्व नागरिकांना नाताळ सणाच्या शुभेच्छा दिल्या. जिल्हा पंचायत सदस्य गोपाळ सुर्लकर, नगराध्यक्ष राया पार्सेकर, यशवंत माडकर, सुभाष फोंडेकर, गुरुप्रसाद नाईक, धर्मेश सागलानी, चंद्रकांत घाडी, माजी आमदार प्रताप गावस, कालिदास गावस, प्रवीण ब्लेगन, मनोजकुमार घाडी, राजेश सावळ पियुष डांगी, महेश गवंडे, मनोहर वळवईकर, आदींनी नागरिकांनी मतदारसंघातिल ख्रिस्ती बांधवाना शुभेच्छा दिल्या
सांखळी मतदारसंघात 24पासून प्रार्थना, विविध कार्यक्रमांसह स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या, त्यास चांगला प्रतिसाद लाभला.