मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे उद्गार : सांखळीतील राधाकृष्ण मुरलीधर देवस्थान परिसराच्या सुशोभिकरणाचे उद्घाटन
प्रतिनिधी /सांखळी
सरकारने सांखळी शहरातच नाही तर संपूर्ण मतदारसंघात विकास साधला आहे. उर्वरित कामेही लवकरच पूर्ण होणार आहेत. विरोधकांनी कितीही विरोध दर्शविला तरी आपले काम सांखळी मतदारसंघातील जनता जवळून पाहत आहे. आमचे सरकार तळागाळातील माणसापर्यंत जाऊन त्याच्या समस्या सोडविण्यासाठी कटिबद्ध आहे. सांखळी शहरातील मास्टर प्लान कुठे गेला, असा प्रश्न विरोधक नेहमी उपस्थित करतात. त्यांच्यासाठी हे मंदिर परिसर सुशोभिकरण उत्तर आहे, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले. सांखळी शहरातील श्री राधाकृष्ण मुरलीधर संस्थान परिसरात देवस्थान समितीच्या सहकार्याने सरकारने केलेल्या सुशोभिकरणाच्या उद्घाटन कार्यक्रमात डॉ. सावंत बोलत होते. दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
यावेळी आमदार दयानंद सोपटे, जिल्हा पंचायत सदस्य गोपाळ सुर्लकर, नगराध्यक्ष राया पार्सेकर, प्रमोद बदामी, देविदास पांगम, देवस्थान अध्यक्ष अनिल काणेकर, राजन कडकडे, दिपराज प्रभू, नगरसेवक आनंद काणेकर, रश्मी देसाई, राजेंद्र आमशेकर, दयानंद बोर्येकर यांची उपस्थिती होती.
पर्यटन विकास मंडळाचे डिचोली तालुक्मयात भरीव काम : दयानंद सोपटे
सरकारने डिचोली तालुक्मयात पर्यटन विकास मोठय़ा प्रमाणात साधला असून जुन्या आकर्षक इमारती, मंदिरे, तळी, धबधबा, सुशोभित करण्यासाठी सरकारने योग्य पावले उचलली आहेत. यासाठी तालुक्मयातून अनेक प्रस्ताव आहेत. येथील प्रसिद्ध हरवळे धबधबा परिसरातही लवकरच विकासकाम सुरू होणार असून पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी खास योजना राबविण्यात येणार आहे. येथील समस्या सोडविण्यासाठीही सरकार कटिबद्ध असल्याचे आमदार दयानंद सोपटे यांनी सांगितले.
देवस्थान अध्यक्ष अनिल काणेकर यांनी सर्वांचे स्वागत केले. प्रमोद बदामी यांनी प्रकल्पाविषयी सविस्तर माहिती दिली. राजन कडकडे यांनी विचार व्यक्त केले. वर्षा मळीक यांनी सूत्रसंचालन केले तर पियुष डांगी यांनी आभार मानले.