सांखळी/प्रतिनिधी
सांखळी मतदारसंघात आज शहर तसेच ग्रामीण भागात तुळशी विवाह उत्सहात साजरा करण्यात आला या निमित्त घरोघरी विधुत रोषणाई करण्यात आली होतो लग्नात लागणारे दीना, चिंच, आवळा झेंडू आंब्याची पाने, इत्यादी साहीत्य आणण्यासाठी लहान मुले आनंदात वावरत दिसत होती
सांखळी बाजारात ही तुळशी विवाह लागणारे साहित्य विक्रीसाठी उपलब्ध होते सर्व मिळून शभर रुपये अशा भावाने विक्री होत होती चिरमुले, चणे, चॅकलेट, लाडू इत्यादी वस्तु?ना खूप मागणी होती,
पाळी, वेळगे, हरवळे, आमोणत्, कुडणे, न्हवेली, विर्डी, वजरी,गावठाण, मावलिंगतड,विठ्ठलापूर इत्यादी परिसरात तुळशी विवाह धार्मिक रित्या साजरा करण्यात आला कोरोना महामारी असल्याने यंदाच्या वषी ग्रामीण तसेच शहरात गर्दी न करता सामाजिक अंतर ठेवून आणि मास्क चा वापर करण्यात आला
: तुळशी वृ?दावन रांगोळी ने सजली
सांखळी मतदारसंघात प्रत्येक हिंदू नागरिकांच्या घरासमोर तुळशी विवाह निमित्त घराचे अंगण शेणाने सारवण्यात आले, रंगीबेरंगी रांगोळी रेखाटण्यात आली होती घराला विधुत रुषणाई करण्यात आली होती ब्राम्हण च्या साक्षीने तुळशी विवाह करण्यात आला