प्रतिनिधी / सांखळी
सांखळी मतदारसंघात शहर तसेच ग्रामपंचायत क्षेत्रात मान्सूनपूर्व कामांना प्रारंभ झाला असून नगराध्यक्ष, नगर सेवक, सरपंच, पंच हे विशेष लक्ष देताना दिसत आहे हरवळे, आमोणा, कुडणे, न्हावेली, सुर्ला, वेळगे, पाळी या पंचायत क्षेत्रातील काही प्रभागात मान्सूनपूर्व कामांना प्रारंभ झाला आहे
सांखळी नगर पालिका क्षेत्रातील सर्व प्रभागात मान्सूनपूर्व कामे : नगराध्यक्ष राया पार्सेकर
सांखळी नगर पालिका क्षेत्रात तेरा प्रभाग असून येथ नेहमीच सत्ता संघर्ष सुरू असतो; मात्र नगराध्यक्ष राया पार्सेकर हे संघटितपणे सरकारच्या सहकार्याने साखळी चा विकास साधण्याचा प्रयत्न करतान. सरकारने आम्हाला पूर्ण सहकार्य देणे आवश्यक असल्याचे यावेळी नगराध्यक्ष पार्सेकर म्हणाले. मान्सूनपूर्व कामे सांखळी शहरात लवकरच पूर्ण करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असून सर्व नगरसेवकांनी आपआपल्या प्रभागात कामे हाती घेतली आहेत, असे पार्सेकर यावेळी म्हणाले.
कुडणे पंचायत क्षेत्रात मान्सून कामांना प्रारंभ झाल्याची माहिती सरपंच महेंद्र एकावडे यांनी दिली ते स्वतः मान्सूनपूर्व कामावर लक्ष ठेवून आहेत, इतर सर्व प्रभागात ही कामे सुरू असल्याचे सरपंच म्हणाले